‘ रफी की याद में ‘ बहारदार मैफल संपन्न
इचलकरंजी ता. ४
समाजवादी प्रबोधिनीचे प्रबोधन वाचनालय आणि रंगयात्रा नाट्यसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ रफी की याद में ‘ ही सिनेगीतांची बहारदार मैफल रसिकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महान सिनेपार्श्वगायक महम्मद रफी यांच्या ४६ व्या स्मृतीदिनानिमित्त ही मैफल आयोजित केली होती. अशा मैफलीचे हे सतरावे वर्ष होते.
प्रारंभी रफी साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अहमद मुजावर यांनी मोहम्मद रफी यांच्या इचलकरंजी भेटीची आठवण विशद करून मैफलीचे उद्घाटन केले. यावेळी रामदास कोळी,अजित मिणेकर,प्रसाद कुलकर्णी,प्रा. मिलिंद दांडेकर ,अरुण दळवी मंचावर उपस्थित होते. तर संजय काशीद यांनी मोहम्मद रफी यांच्या वेशभूषेत उपस्थिती दाखवत आणि गीत सादर करून रसिकांची दाद मिळवली.
मैफिलीची सुरुवात किरण कटके यांच्या (कल की दौलत) या गीताने झाली. यानंतर विवेक कुंभार (आज मौसम बडा बेईमान है),विजय यादव( तुम मुझे यूं न भुला पाओगे)शिल्पा गलगले (ये दिल तुम बिन ) यांच्या गीताने रंग भरण्यास सुरुवात केली. विकी बाबर (पुकारता चला हूं मैं) अरुण दळवी (ए फुलोंकी रानी),अजित भिडे (चांद मेरा दिल) अजिंक्य वाळवेकर (तेरी गलियोंमे),यांच्या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले.
तसेच प्रविण होगाडे (एक हंसी शाम ),कांचनमाला भाट( ओ सनम तेरे ) ,मिलिंद दांडेकर (छलकाये जाम),नजीर शेख(आपके हसीन रुख), चंद्रकांत रानडे (न झटको जुल्फ से पानी), पी.बी.जाधव(सुबह न आयी)यांच्या गाण्याने मैफिल धुंद झाली. आरिफ व तमन्ना तांबोळी (वादा कर ले साजना), अजित भिडे व सुरेखा सोनवणे (आदमी मुसाफिर है), कांचनमाला भाट व अरुण दळवी(मुझे कितना प्यार है),विकी बाबर व तमन्ना तांबोळी(बेखुदी मे सनम)कोमल बाळेकुंद्री व विवेक कुंभार +रात के हमसफर )या युगलगीतांनी मैफिल आणखीच बहरली.
त्यानंतर मनिष आपटे(सुभान अल्ला),गजानन ढवळे(याद न जाये ),संजय काशीद(मै कहीं कवी न ) ,सतिश पोतदार (ऐसे तो न देखो),भाऊसो केटकाळे(मैं एक राजा हूं )महेश पोटे(चाहूंगा मैं तुझे)या गीतांनी मैफिल नशिली झाली. जगन्नाथ पोटे यांनी गायिलेल्या (ओ दुनिया के रखवाले ) सर्वांच्याच काळजाला भिडले. कार्यक्रमाची सांगता अरुण केटकाळे यांच्या ( चलो रे डोली,उठाओ रे )या गीताने झाली. तब्बल चार तास चाललेल्या या गीत मैफिलीत महम्मद रफी यांच्या स्मृतीने रसिक पूर्व श्रावणसरीत चिंब झाले. या मैफिलीचे बहारदार निवेदन अरुण दळवी यांनी केले.तसेच मिलिंद दांडेकर यांच्या किस्स्यांनी त्यात रंगत आणली. या मैफलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




