ICHMH51NEWS.IN
9921600800

कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या गृहविज्ञान विभागाकडून स्तनपान सप्ताहनिमित्त आहारविषयक मार्गदर्शन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या गृहविज्ञान विभागाकडून स्तनपान सप्ताहनिमित्त आहारविषयक मार्गदर्शन

इचलकरंजी
एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प, हातकणंगले 2 अंतर्गत बीट पट्टणकोडोली-३ चंदूर येथील अंगणवाडीमार्फत आरोग्य व पोषणविषयक लाभ घेणाऱ्या गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना १ ते ७ ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये स्तनदा व गर्भवती स्त्रियांना आहारविषयक मार्गदर्शन देण्यासाठी श्रीमती आ. रा. पाटील महाविद्यालयातील गृहविज्ञान विषयाच्या विदयार्थीनी व प्राध्यापकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी गृहविज्ञान विभागाच्या बी. ए. भाग ३ च्या विद्‌यार्थीनीनी किशोरवयीन मुलींचा समतोल आहार व गर्भावस्थेतील समतोल आहार याविषयी उपस्थित लाभार्थींना मार्गदर्शन केले. तसेच प्रा. स्वाती हाळवणकर यांनी स्तनपानाचे महत्त्व व स्तनदा मातेचा आहार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच गृहविज्ञान विभागप्रमुख प्रा. संगीता पाटील यांनी सुरक्षित व आनंदी प्रसूती काळ व बाळाचा पूरक आहार याविषयी स्तनदा व गर्भवती लाभार्थी महिलांना मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सुपरवायझर सौ. स्मृती गवळी, अंगणवाडी सेविका यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी महाविदयालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. श्रुती जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा