ICHMH51NEWS.IN
9921600800

सराईत गुन्हेगार अनिल येजरे दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सराईत गुन्हेगार अनिल येजरे दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

इचलकरंजी : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अनिल निवृत्ती येजरे (रा. वैरण बाजारजवळ, इचलकरंजी) याला दोन वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अनिल येजरे याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन, हुपरी पोलीस ठाण्यात एक, पन्हाळा पोलीस ठाण्यात एक आणि इचलकरंजी पोलीस ठाण्यात एक असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार असल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचा तडीपार प्रस्ताव इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावास उपविभागीय दंडाधिकारी यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी मंजुरी दिली. त्यानुसार अनिल येजरे याला दि. १६ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई केली.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा