ICHMH51NEWS.IN
9921600800

दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

इचलकरंजी : मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) व केन चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दुसरी केन अखिल भारतीय खुली बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धा २०२६’ स्व. सौ. प्रतिभा बाळासाहेब लांडे सांस्कृतिक भवन येथे उत्साहात पार पडली. चेस असोसिएशन कोल्हापूर व चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ५० संघांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत फाईट क्लब संघाने १२ सामना गुण व २२ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत ₹५ हजार व चषक मिळविला. मास्टरमाइंड मंडळी संघाने १२ सामना गुण व २१.५ गुणांसह द्वितीय क्रमांक, तावडे बुद्धिबळ अकादमीने ११ सामना गुणांसह तृतीय, तर केन किंग्सने ११ गुणांसह चतुर्थ क्रमांक मिळविला.

विशेष पारितोषिकांमध्ये केन क्वीन्सला सर्वोत्तम महिला संघ, समर्थ विद्यामंदिर इचलकरंजीला सर्वोत्तम १० वर्षांखालील शालेय संघ, डीकेटीई डिफेन्स वॉरियर्सला सर्वोत्तम १६ वर्षांखालील शालेय संघ आणि डीवायपी शस्त्रक्रिया योद्धे संघाला सर्वोत्तम डॉक्टर संघाचा पुरस्कार मिळाला.

पारितोषिक वितरणप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव, सचिव डॉ. अमित देशमुख, खजिनदार डॉ. उत्तम माळी, क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. श्रीधर जाधव व केन एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक निकुंज बगडिया उपस्थित होते.

स्पर्धेचे आयोजन केन चेस अकॅडमीचे प्रोप्रायटर व मुख्य प्रशिक्षक फिडे डी.आय. रोहित पोळ यांनी केले. स्पर्धेत ₹१५ हजार रोख रक्कम, १४ चषक व १२ पदकांचे वितरण करण्यात आले.


पारितोषिक वितरण प्रसंगी मेडिकल असोसिएशनचे सदस्य.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा