ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा

इचलकरंजी दि.२२ नोव्हेंबर-
मराठी कला क्षेत्रातील प्रसिद्ध मालिका आणि नाट्य अभिनेते, सूत्र संचालक व मुलाखतकार विघ्नेश जोशी यांची ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत कार्यशाळा’ इचलकरंजीत आयोजित करण्यात आली आहे. येथील अ. भा. मराठी नाट्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद, रोटरी क्लब सेंट्रल, रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्या वतीने ही कार्यशाळा होणार आहे.
सदरची कार्यशाळा शनिवार दिनांक ५ डिसेंबर २०२६ रोजी दुपारी ३•३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत नाकोडा नगर येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत निवेदन आणि सूत्रसंचालन यातील फरक, निवेदकाची जबाबदारी तसेच या क्षेत्रामधील व्यावसायिक संधी, इत्यादीबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ही कार्यशाळा १६ वर्षावरील युवक, युवती आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रम करणा-या सर्वांसाठी उपयुक्त आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी मनोरंजन मंडळ, दाते मळा, इचलकरंजी येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

राजाराम स्टेडियमच्या कामात ४० लाखांची माती!,निकृष्ट काम करूनही उर्वरित ८ लाखांचे बिल काढण्यासाठी दबाव? मक्तेदाराचा पुळका कशासाठी? – महापौर उदय धातुंडेनिकृष्ट काम जनतेने पाहावे, मनमोहक लॉन बघून निर्णय घ्यावा – सभागृह नेते विठ्ठल चोपडे