ICHMH51NEWS.IN
9921600800

सलग तिसऱ्या दिवशी महापौरांची स्वच्छता पाहणी; प्रभाग ५ व ७ मधील व्यवस्थेचा घेतला आढावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सलग तिसऱ्या दिवशी महापौरांची स्वच्छता पाहणी; प्रभाग ५ व ७ मधील व्यवस्थेचा घेतला आढावा

इचलकरंजी : शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्याच्या उद्देशाने महापौर उदय धातुंडे यांनी सलग तिसऱ्या दिवशी सकाळी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रभाग क्रमांक ५ व ७ मधील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करून कचरा संकलन आणि विल्हेवाट प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला.

पाहणीदरम्यान महापौरांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कचरा संकलन नियमित व वेळेत करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या घरातून कचरा संकलित करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.

शहरातील ठिकठिकाणी असलेले सेकंडरी पॉईंट (दुय्यम कचरा संकलन ठिकाणे) टप्प्याटप्प्याने बंद करून थेट कचरा संकलनाची व्यवस्था प्रभावी करण्यावर महापौरांनी विशेष भर दिला. यासाठी संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रस्त्यालगतच्या दुकानदार, व्यापारी व व्यावसायिक आस्थापनांना दुकानांसमोरील परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. रस्त्यावर अथवा फुटपाथवर कचरा न टाकता तो घंटागाडीकडेच द्यावा, तसेच प्लास्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन त्यांनी केले.

शहर स्वच्छतेच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि नागरिकांनी समन्वयाने काम करून स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे महापौर उदय धातुंडे यांनी सांगितले.

स्वच्छ इचलकरंजी हे केवळ महानगरपालिकेचे नव्हे, तर प्रत्येक नागरिक आणि व्यावसायिकाचे सामूहिक उद्दिष्ट असल्याचे सांगत महापौरांनी प्रत्यक्ष पाहणीद्वारे स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

राजाराम स्टेडियमच्या कामात ४० लाखांची माती!,निकृष्ट काम करूनही उर्वरित ८ लाखांचे बिल काढण्यासाठी दबाव? मक्तेदाराचा पुळका कशासाठी? – महापौर उदय धातुंडेनिकृष्ट काम जनतेने पाहावे, मनमोहक लॉन बघून निर्णय घ्यावा – सभागृह नेते विठ्ठल चोपडे

राजाराम स्टेडियमच्या कामात ४० लाखांची माती!,निकृष्ट काम करूनही उर्वरित ८ लाखांचे बिल काढण्यासाठी दबाव? मक्तेदाराचा पुळका कशासाठी? – महापौर उदय धातुंडेनिकृष्ट काम जनतेने पाहावे, मनमोहक लॉन बघून निर्णय घ्यावा – सभागृह नेते विठ्ठल चोपडे