ICHMH51NEWS.IN
9921600800

महापालिकेच्या कागदपत्रे अवैध असलेल्या कचरा गाड्यांवर आरटीओची कारवाई ६ ते ७ वाहनांवर कारवाई; नागरिकांच्या तक्रारींची आरटीओकडून गंभीर दखल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 महापालिकेच्या कागदपत्रे अवैध असलेल्या कचरा गाड्यांवर आरटीओची कारवाई

६ ते ७ वाहनांवर कारवाई; नागरिकांच्या तक्रारींची आरटीओकडून गंभीर दखल

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांबाबत वैधता नसल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत ६ ते ७ कचरा संकलन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत आरटीओने हे पाऊल उचलले आहे.
शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनांबाबत अनेक नागरिकांनी आरटीओ कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. वाहनांच्या कागदपत्रांमधील त्रुटी तसेच नियमांचे पालन होत नसल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर परिवहन विभागाने या प्रकरणाकडे लक्ष दिले. यासंदर्भात महापालिका प्रशासन आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने अखेर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली.
याबाबत माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते म्हणाले, कचरा गाड्यांबाबत आरटीओकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांना सूचना देऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
यापुढेही अशा अवैध वाहनांविरोधात तपासणी आणि कारवाई सुरूच राहणार असल्याचे नकाते यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महापालिकेच्या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या वैधतेचा आणि कागदपत्रांच्या पूर्ततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

राजाराम स्टेडियमच्या कामात ४० लाखांची माती!,निकृष्ट काम करूनही उर्वरित ८ लाखांचे बिल काढण्यासाठी दबाव? मक्तेदाराचा पुळका कशासाठी? – महापौर उदय धातुंडेनिकृष्ट काम जनतेने पाहावे, मनमोहक लॉन बघून निर्णय घ्यावा – सभागृह नेते विठ्ठल चोपडे

राजाराम स्टेडियमच्या कामात ४० लाखांची माती!,निकृष्ट काम करूनही उर्वरित ८ लाखांचे बिल काढण्यासाठी दबाव? मक्तेदाराचा पुळका कशासाठी? – महापौर उदय धातुंडेनिकृष्ट काम जनतेने पाहावे, मनमोहक लॉन बघून निर्णय घ्यावा – सभागृह नेते विठ्ठल चोपडे