महानगरपालिकेकडून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे शहापूर खणीमध्ये विसर्जनासाठी केलेल्या आवाहनास शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार-ओमप्रकाश दिवटे
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामध्ये मंगळवार दि.१७ सप्टेंबर अनंत चतुर्थी दिवशी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन यावर्षी आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी शहापूर खणीमध्ये करावे असे आवाहन केले होते. सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तीं विसर्जनाची व्यवस्था शहापूर हायस्कूल मागील विसर्जन स्थळ , ओपन जीम जवळ आणि बालाजी नगर पद्मा पॅलेस समोर या ठिकाणी क्रेनसह विसर्जनाची व्यवस्था करणेत आलेली होती.
महानगरपालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणेश मंडळाच्या गणेश मुर्तींचे
विसर्जन शहापूर खणीमध्ये करुन मौल्यवान सहकार्य केले.
अनंत चतुर्दशी दिवशी मंगळवारी १३४ सार्वजनिक गणेश मूर्ती तसेच ३०० घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन शहापुर खणीमध्ये करणेत आले अशा एकूण ४३४ गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवारी करणेत आले.
गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी सहा आयुक्त विजय कावळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, सहा.आयुक्त केतन गुजर, सहा. आयुक्त विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत संगेवार, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, विद्युत अभियंता संदीप जाधव , स्वच्छता निरीक्षक विजय पाटील,सुर्यकांत चव्हाण, मंगेश दुरुगकर, रफिक पेंढारी, महादेव मिसाळ, सुरज माळगे, विशाल आवळे, यांचेसह सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता निरिक्षक, प्रभाग अधिकारी, अतिक्रमण विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, आरोग्य विभागाकडील एकुण २०० अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या सह आधार रेस्क्यू फोर्स, स्पेशल कमांडो फोर्स, वीर रेस्क्यु फोर्स,शहरातील पट्टिचे पोहणारे स्वयंसेवक तसेच ३ यांत्रिक बोटी, ३ क्रेन, १ अग्निशमन वाहन, ४ रुग्णवाहिका (इचलकरंजी महानगरपालिका, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, एन.यु. एच.एम.विभाग सेवाभारती रुग्णालय, क.बा. आवाडे चॅरिटेबल ट्रस्ट ) यांचा समावेश होता.
या संपूर्ण महापालिका यंत्रणेवर आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त सोमनाथ आढाव संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवून होते.
महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी सार्वजनिक मंडळाचे आभार व्यक्त केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







