६-१०-२०२४ रोजीची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई पंचमुखी गायत्री रुपातील पुजा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

६-१०-२०२४ रोजीची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई पंचमुखी गायत्री रुपातील पुजा

आज अश्विन शुक्ल तृतीया शारदीय नवरात्र महोत्सव 2024 चा आजचा चौथा दिवस आजच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई पंचमुखी गायत्री रुपात सजली आहे.
आहे.
राजपदाचा त्याग करून शाश्वत सत्याच्या शोधात निघालेल्या विश्वामित्र ऋषीना जी दिसली ती ही गायत्री.
मोती पोवळे सोने नील शुभ्र असे तिच्या पाच मुखांचे रंग अनुक्रमे वायू अग्नी भूमी आकाश जल यांचे प्रतिनिधीत्व करतात तर तिची वरद पोथी गदा परशू
शंख चक्र पानपात्र चाबूक दोन कमळं ही दहा आयुधे देवी गणेश विष्णू शिव सूर्य या पंचायतन देवतांचे रूप दाखवतात. तिचे कमलासन हे षटचक्रांचे तर हंस वाहन हे सोऽहं वृत्तीचे प्रतिक आहे.अशी मंत्र श्रेष्ठ गायत्री आम्हाला शाश्वत ब्रम्ह तेजाची ओढ लावो हीच या शब्दब्रम्हात्मिके चरणी प्रार्थना
श्रीमातृचरणारविंदस्य दासः प्रसन्न

व्हिडीओ साठी खाली क्लिक करा

https://youtube.com/shorts/S9PlWZ4aI5k?si=IziPgCwYiv-pbwYQ

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More