ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने विद्यार्थ्याकरिता तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी च्या वतीने विद्यार्थ्याकरिता तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रबोधनपर व्याख्यान संपन्न
इचलकरंजी :वयात येताना होणारे शारीरिक बदल यांच्याकडे शास्त्रशुद्ध दृष्टीने कसे पहावे आणि त्याचा अभ्यासात व्यत्यय आणू न देता सकारात्मक दिशेने वाटचाल कशी करावी याची विवेचन स्लाइड्स, व्हिडिओ आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सांगलीचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिल मडके व डॉक्टर्स पल्लवी अनुजे यांनी श्रीमंत ना. बा .घोरपडे नाट्यगृह येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी करता आयोजित केलेल्या तारुण्याच्या उंबरठ्यावर या प्रबोधन पर व्याख्यानात ते बोलत होते रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी ,रोटरी क्लब इचलकरंजी अँड च्या वतीने आठवी व नववीच्या विद्यार्थ्याकरिता तारुण्याच्या उंबरठ्यावर हा लैंगिक शिक्षणावर आधारित प्रबोधनपर कार्यक्रम श्रीमंत ना. बा .घोरपडे नाट्यगृह येथे घेण्यात आला यावेळी दोन सत्रात झालेल्या कार्यक्रमात 1800 विद्यार्थी विद्यार्थिनींनी व शिक्षक यांनी सहभाग घेतला होता .आरोग्य विषयी डॉ. अनिल मडके व डॉ.पल्लवी अनुजे यांनी विद्यार्थ्यांना आहारात पालेभाज्या ,प्रथिने ,फळभाजी यांचा समावेश करावा .नियमित व्यायाम करावा ,व्यसनाधीनता ,पुरेशी झोप याचबरोबर स्वच्छतेची काळजी याविषयी माहिती दिली .विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आज प्रत्येकाने धडपड करण्याची गरज आहे यासाठी वेळेला महत्त्व द्या, मोबाईलच्या जाळ्यात विद्यार्थी व तरुण पिढी मोठ्या प्रमाणात अडकत आहे त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे .थोर व्यक्तींचा जीवन परिचय वाचा त्यातून तुम्हाला एक मोठी प्रेरणा मिळेल पॉझिटिव्ह राहा ,नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता त्यांना डॉ. मडके यांनी समर्पक उत्तरे दिली .
           श्रीमंत ना. बा.घोरपडे नाट्यगृह येथे  झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी स्वागत पर प्रास्ताविक केले .व्याख्याते डॉ. अनिल मडके यांची ओळख प्रोजेक्ट चेअरमन पिरगोंडा पाटील यांनी करून दिली. सौ पल्लवी अनुजे यांची ओळख रोटरी  ॲन्स च्या अध्यक्षा सौ स्वाती सातपुते यांनी करून दिली .आभार सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौन्सिलर अभय येळरुटे यांनी केले .कार्यक्रमा वेळी रोटरीचे डी.एम .कस्तुरे, वसंत पाटील, पंकज कोठारी ,श्रीनिवास दबडे , सत्यनारायण धूत ,महेश दाते ,शरद देसाई, सौ .शर्मिला पाटील ,सौ.सुरेखा कोथळे आदी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा