इचलकरंजी विधानसभेसाठी सोमवारी ९ उमेदवारांनी नेले १४ अर्ज,५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
इचलकरंजी
विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २७९ इचलकरंजी विधानसभा मतदार संघात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी ९ व्यक्ती/उमेदवार यांनी एकूण १४ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.सुहास जांभळे यांचे २ अभिषेक पाटील, सचिन बेलेकर, आरती माने,रवी पाटोळे यांचे प्रत्येकी १ असे ६ नामनिर्देशन पत्र आज दाखल झाले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.
उमेदवारी अर्ज नेणाऱ्या मध्ये रावसो गणपती निर्मळे,मुमताज निसार कनवाडे,सचिन किरण बेलेकर,नासीर गौस अपराध,सुहास अशोकराव जांभळे,सुहास अशोकराव जांभळे,प्रशांत ज्ञानेश्वर गंगावणे,सुहास अशोकराव जांभळे,उदयसिंग मारुती पाटील यांचा समावेश आहे.
सुहास अशोकराव जांभळे उमेदवारी अर्ज दाखल करताना.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







