इचलकरंजी बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. तोष्णीवाल यांचा माहेश्वरी सभेतर्फे सत्कार.
इचलकरंजी – येथील दि इचलकरंजी बार असोशिएशनच्या अध्यक्षपदी माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ अॅड. आर. आर. तोष्णीवाल यांची निवड झालेबद्दल बांगड परिवार, नॅचरल ग्रुप आणि माहेश्वरी सभेतर्फे जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नितीन धुत, महेश सेवा समितीचे अध्यक्ष नंदकिशोर भुतडा, महेश सेवा समिती ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष श्रीवल्लभ बांगड, माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
इचलकरंजी बार असोशिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत माहेश्वरी समाजाचे अॅड. आर. आर. तोष्णीवाल यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी लाभली आहे. अॅड. तोष्णीवाल यांच्या निवडीबद्दल माहेश्वरी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक नितीन धुत यांनी केले. अॅड. आर. आर. तोष्णीवाल यांनी, मला मिळालेल्या या संधीचा सदुपयोग मी सर्वसामान्यांना न्याय देण्यासह संधीचे प्रामाणिकपणे सोनं करेन, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी डॉ. सौ. गार्गी हर्षल बरगाले यांना पी.एच.डी.पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच आय.एम.फिटचे महेश शेळके यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास समाजातील विविध क्षेत्रातील उद्योगपती, मान्यवर उपस्थित होते. महेश सेवा समितीचे सचिव राधामोहन छापरवाल यांनी सूत्रसंचालन केले. तर महेश सेवा समिती ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष श्रीवल्लभ बांगड यांनी आभार मानले. याप्रसंगी कमलेश राठी, धनराज डाळ्या, राधेशाम बंग, लालचंद गट्टाणी, श्यामसुंदर झंवर, अशोककुमार मंत्री, संजय बिरला, सुरेश बांगड, हिराचंद बरगाले, कुमार धड्ड आदी व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
फोटो – अॅड. आर. आर. तोष्णीवाल यांचा सत्कार करताना नितीन धुत नंदकिशोर भुतडा, श्रीवल्लभ बांगड, राधामोहन छापरवाल, सागर चाळके, सोहनलाल बांगड आदी मान्यवर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800