ICHMH51NEWS.IN
9921600800

आवाडेंच्या सहकार व हाळवणकरांच्या संघटनात्मक योगदानाने राहुल आवाडेना गुलाल लागणार-. आ.शशिकला जोल्ले

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आवाडेंच्या सहकार व हाळवणकरांच्या संघटनात्मक योगदानाने राहुल आवाडेना गुलाल लागणार-. आ.शशिकला जोल्ले

कबनूर –
मजबूत पायावरच इमारत खंबीरपणे उभी राहते. त्याचप्रमाणे आवाडे परिवाराने  सहकार चळवळीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली आहे.  त्याला जोड म्हणून दहा वर्षात सुरेश हाळवणकर यांनी भाजपाला मजबुत केले आहे. याचा एकत्रित परिणाम 23 तारखेला राहुल आवाडे यांना गुलाल लागल्याचे दिसून येईल, असा विश्‍वास इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला.
दत्तनगर कबनूर येथील गुलजार कार्यालय याठिकाणी 279-इचलकरंजी  विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ  आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात आमदार सौ. जोल्ले बोलत होत्या.
यावेळी राहुल आवाडे यांनी कबनूर गावातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. आमदार प्रकाश आवाडे यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून कबनूरचा कायापालट करण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देताना त्यामध्ये कोणाही ग्रामस्थांना आर्थिक झळ बसू दिली नाही. गावातील प्रत्येक भागासाठी भरघोस निधी उपलब्ध करुन देत सर्वांगिण विकास केला. ही विकासाची गंगा अशीच सुरु राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार आवश्यक आहे. त्यासाठी तुमचे मतरुप आशिर्वाद देऊन मला पर्यायाने महायुतीला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे  अध्यक्ष अशोक स्वामी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ वैशाली आवाडे, बी. डी. पाटील, मधुकर मणेरे, सौ. विजया पाटील, कबनूर सरपंच सौ. सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे, सौ. रेश्मा सनदी, रांगोळी सरपंच सौ. संगीता नरंदे , वृषभ  जैन, बबन केटकाळे, नितीन कडाप्पा, जयकुमार कडाप्पा, राजेश रजपूत,  निलेश पाटील, सौ. अश्‍विनी कुबडगे, युवराज पाटील, रघू हळवणकर, तात्या पाटील, दादा पाटील, संतोष  कांदेकर यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा