ICHMH51NEWS.IN
9921600800

राहुल आवाडेंच्या कोरोची पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल आवाडेंच्या कोरोची पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद

कोरोची

राज्यातील गतिमान महायुती सरकारने वेगाने निर्णय घेत सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना उभारी देण्याचे काम केले आहे. विकासाचा हा वेग असाच गतिमान राहण्यासाठी राज्यात महायुतीचेच सरकार येण्याची गरज आहे. त्यासाठी मतदार बंधु-भगिनींनी आपले मतरुपी आशिर्वाद देऊन माझ्या माध्यमातून महायुती सरकारला बळ द्यावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी केले.
महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कोरोची परिसरात भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ पंचगंगा साखर कारखाना परिसरातील श्री गणेशाचे पुजन आणि देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करुन करण्यात आले. गणपती मंदिरापासून सुरु झालेली ही पदयात्रा अमोल बेकरी, निलतारा हॉटेल, साई कॉलनी, क्रांतीज्योतनगर, धनगरमाळ आदी परिसरातून काढण्यात आली. धनगरमाळ याठिकाणी पदयात्रेची सांगता झाली. यावेळी सर्वच ठिकाणी राहुल आवाडे यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. विशेषत: तरुणवर्गात उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. फटाक्यांची आतषबाजी अन् वाद्यांचा गजर करत जागोजागी महिलांनी राहुल आवाडे यांचे औक्षण करत त्यांना विजयासाठी शुभाशिर्वाद दिले.
या पदयात्रेत कोरोची गावातील भाजपाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, बुथप्रमुख, तरुण, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा