ICHMH51NEWS.IN
9921600800

रोटरी डायलिसिस विभागाचे अलायन्स हॉस्पिटलमध्ये लोकार्पण.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रोटरी डायलिसिस विभागाचे अलायन्स हॉस्पिटलमध्ये लोकार्पण.

इचलकरंजी
रोटरी क्लब इचलकरंजी एक्झिक्यूटिव्ह,बेंगलोर किडनी फाउंडेशन व अलायन्स  हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानाने ६ नोव्हेंबर २०२४ रोजी  रोटरी डायलेसिस विभागाचे उद्घाटन व लोकार्पण हा कार्यक्रम पार पडला.
 बेंगलोर किडनी फाउंडेशन चे चेअरमन रो.डॉ.पी.श्रीराम यांचे शुभहस्ते व रोटरी डिस्ट्रिक्ट-३१७० चे आयपीडीजी रो. नासिरजी बोरसदवाला यांचे अध्यक्षतेखाली तसेच डीजीई रो. अरुणजी भंडारे,बेंगलोर किडनी फाउंडेशनचे सन्माननीय डायरेक्टर श्री. मोहनजी के. एच.,डिस्ट्रिक्ट ३१९२ चे ग्लोबल ग्रँड डायरेक्टर मा.रो.वसंतजी चंद्राजी,असिस्टंट गव्हर्नर रो. दादासाहेब चौगुले, अलायन्स हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. बाळकृष्ण कित्तुरे, अलायन्स हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सॅम्युअल भंडारे तसेच क्लबचे प्रेसिडेंट गणेश निकम व सेक्रेटरी विवेक हसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
सदर रोटरी डायलिसिस विभागामध्ये तीन डायलेसिस मशीन आज चालू करण्यात आल्या. अलायन्स हॉस्पिटलमध्ये या आधी ४ डायलिसिस मशीनवर रुग्णांवरती उपचार होत होते. तरीही दर महिन्याला जवळपास 100 पेशंटना वाट पहावी लागत होती. आता या मशीन्स चालू करण्यात आल्यामुळे त्यांना वेळेवर व जलद गतीने उपचार घेण्यास मदत होणार आहे.
 क्लबचा पहिला कायमस्वरूपी प्रोजेक्ट आज सुरू झाला. या प्रोजेक्टसाठी बेंगलोर किडनी फाउंडेशन तसेच आयपीडीजी रो नासिरजी बोरसादवाला, डिजीई रो. अरुणजी भंडारे व अलायन्स हॅास्पीटल यांचे सहकार्य लाभले.
आजच्या कार्यक्रमास मा. रो. अरुणजी गोयंका, रो. नंदू बलदवा, रो. पन्नालाल डाळ्या, रो. नेमीनाथ कोथळे, रो. प्रकाश गौड, रो. संतोष पाटील, रो. सुदर्शन कदम, रो. अनिकेत पाटील, रो. शशीकांत खोत, रो. राजू माळी, रो. निल्लू लांबा, रो. आरती मंगलानी व इचलकरंजी व आसपासच्या क्लब मधील अनेक रोटेरियन्स तसेच क्लब मधीलही सर्व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.भविष्यात असेच चांगले लोकोपयोगी प्रोजेक्टस् क्लबच्यावतीने सुरू व्हावेत असा मानस आहे
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा