इचलकरंजीत पत्रकार सचिन बेलेकर निवडणूक रिंगणात
इचलकरंजी
मतदार बंधू आणि भगिनींनो आजवर तुम्ही मतदान करित आला आहात केवळ तुमच्या मताचा वापर करायचा आणि राजकारणात यायचं आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची अशाच लोकांना आजवर तुम्ही निवडून दिला जरा विचार करा येणारा कालखंड हा वेगळा असणार आहे कोणत्याहि सर्व सामान्य घरातील मुलगा आमदार खासदार होत नाही फक्त एकाच घराण्याची घराणेशाही चालते का तर श्रीमंती असते म्हणून… नाही तुम्ही मतदान करता म्हणून..फक्त तुम्ही मतदान करताय म्हणून मग तुमच्या मुलाबाळाने कधी प्रगती केलीय जरा विचार करा आज जर का डोळे उघडले नाहीत तर पुन्हा महागाई वाढली पेट्रोलचे दर वाढले म्हणून रडत बसू नका येणारा कालखंड हा बिकट परिस्थितीचा असणार आहे बेरोजगारी तर वाढलीच आहे त्यात आरोग्याच्या समस्या, शिकून नोकरी नाही, त्यात भरीस भर पाण्याच राजकारण,
विकास नेमका होतोय कोणाचा, एकीकडे कोटींची विकास कामे झाली म्हणायचे आणि गल्लीत बघितलं तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता तेच समजत नाही.अशा कित्येक समस्या अजूनही सतावत आहेत. आणि यासाठीच सामान्य जनतेचा, सामान्य घरातील उमेदवार प्रा. सचिन बेलेकर हे राष्ट्रीय समाज पक्ष कडून हिरा या चिन्हाखाली या निवडणुक रिंगणात उतरले. जनतेचा विश्वास हिच खरी ताकत मानून त्यांनी हे पाऊल उचलले आता येणारा निकालच हा विश्वास किती सार्थ ठरतो हे पाहणे यथार्थ ठरेल
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







