ICHMH51NEWS.IN
9921600800

राहुल आवाडेना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी कामाला लागुया-मनोज साळुंखे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राहुल आवाडेना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी कामाला लागुया-मनोज साळुंखे.
इचलकरंजी –
जिल्हा परिषद सदस्य असताना राहुल आवाडे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघाचा केलेला विकास सर्वांनाच माहित आहे. शिवाय अनेक वर्षापासून ते आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी कार्यरत आहेत. त्याला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांची साथ लाभल्याने राहुल आवाडे यांचा विजय निश्‍चित झाला आहे. तरीही आपण विक्रमी मताधिक्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 12 भोने माळ श्रीमंत शाहूनगर याठिकाणी नगरसेवक मनोज साळुंखे व महादेवराव हळवणकर यांच्या नेतृत्वाखाली चाय पे चर्चा कार्यक्रम पार पडला. त्याप्रसंगी मनोज साळुंखे यांनी आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी अनेक ज्येष्ठ मान्यवरांसह नागरिका, महिला, तरुणवर्ग मोठ्या संख्येने जमला होता.
राहुल आवाडे यांनी, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आजवर मतदारसंघाचा कायपालट केला आहे. भविष्यामध्ये तुम्ही जे काही काम सांगाल ते खटक्यावर बोट जाग्यावर पलटी अशा पद्धतीने करून दाखवू. शहरातील पिण्याचे पाणी,वस्त्रोद्योग, आयजीएम हॉस्पिटल यासह शहरवासियांना भेडसावणारा क 1 शेराल झोपडपट्टीवासियांचे आहे त्याठिकाणीच पुनर्वसन, कामगार चाळीतील कर्मचार्‍यांच्या घरांचा विषय आदी प्रश्‍न निश्‍चितपणे मार्गी लावू. मतदार माझ्यावर जो मतांद्वारे विश्‍वास दाखवितील त्यांचे मत वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी माजी नगरसेविका अनिता अशोक कांबळे, अ‍ॅड. दत्तात्रय कंदले, प्रशांत पांढरपट्टे, अनिल ठाणेकर, सौ. विद्या सुतार, नागुताई लोंढे, सतीश भस्मे, शकील जमादार, श्रीनिवास फुलपाठी, दत्ता चव्हाण, कुमार शिंदे, सागर कुंभार, इलियास गवंडी, महादेव बिरंजे, दामोदर पाटील, विष्णू शिंगारे, दिलीप धातुंडे, अरुण निंबाळकर, मनोहर कांबळे, सिद्धार्थ कांबळे, संजय माने, सौ. अरुणा माने, अविनाश सावरतकर यांच्यासह शाहूनगर चौक, भोने माळ परिसरातील ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी रवींद्र भांडे, चांद जमादार, शेखर भंडारे, दत्ता मुदगल, सचिन सुतार, सुनील भांडे, सलीम नदाफ, महादेव सातपुते यांनी परिश्रम घेतले
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा