ICHMH51NEWS.IN
9921600800

चंदूरच्या सर्वांगीण विकासाने माझा विजय निश्चित- डॉ. राहूल आवाडे   

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चंदूरच्या सर्वांगीण विकासाने माझा विजय निश्चित- डॉ. राहूल आवाडे   

चंदूर –
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील चंदूर गावच्या सर्वांगिण विकाससाठी मीसुध्दा कटीबध्द आहे. आजपर्यंत आमदार प्रकाश आवाडे यांनी गावातील रस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण, गटर आदींच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठीची 22 कोटी खर्चाच्या योजेनची अंमलबजावणी सुरु केली असून नागरिकांना मोफत जोडणी दिली जात आहे. विरोधकांकडे विकासाचा कोणताच मुद्दा नसल्याने ते वैयक्तीक टीका करीत आहेत. त्याकडे लक्ष न देता प्रगतीची विकासगंगा अशीच चालू ठेवण्यासाठी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा, असे आवाहन उमेदवार महायुतीचे उमेदवार राहूल आवाडे यांनी केले.
महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ चंदूर येथे भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा शुभारंभ  श्री. महासिद्ध मंदिर येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील व प्रमुख पदाधिकारांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
राहुल आवाडे यांनी, चंदूर गावात केलेल्या विकासकामांचा आढावा घेत मराठा समाज भवन, दलीत वस्ती सुधारणा, महापूर काळात पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, जनावरांना चारा अशी अनेक कामे केलेली आहेत. यापुढे मी आमदर प्रकाश व माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदूर गावातून हुपरी, कागल, कर्नाटककडे जाण्यासाठी  नदीवर उन्हाळी पुल बांधणे तसेच गणेश मंदीर जवळ नदीवर घाट बांधणे, चंदूरात प्रशस्त कुस्ती संकुल बांधणे आणि महापूर येऊ नये म्हणून राज्य व केंद्राच्या मदतीने उपाययोजना करणे ही कामे प्रामुख्याने केली जातील, अशी ग्वाही दिली.
भाजाप प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांनी, आपल्या चंदूर गावच्याच उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावे. महायुती सरकारने लाडकी बहिणसाठी दरमहा 1500 रुपये, विद्यार्थीनींना उच्च शिक्षण मोफत केले आहे.  त्यामुळे समाजातील अनेक विद्यार्थीनी उच्च शिक्षण घेत आहेत. शेतकर्‍यांना मोफत वीज पुरवठा, एस.टी.मध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिल्याने राज्य सरकारची एस.टी. फायद्यात आलेली आहे. म्हणून या योजना सक्षमपणे राबिवणेसाठी राहुल आवाडे यांना विजयी करुन महायुतीचे सरकार आणा असे आवाहन केले.
संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत जागोजागी लाडक्या बहिणी व ज्येष्ठ महिलांनी राहुल आवाडे यांचे औक्षण करत विजयाच्या शुभेच्छा देत आम्ही ठामपणे पाठीशी राहू असे सांगितले. या पदयात्रेत चंदूर गावातील ज्येष्ठ मान्यवर, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, तरुण, तरुणी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा