सुज्ञ मतदार सवंग प्रसिद्धीला बळी न पडता राहुल आवाडेंच्या पाठीशी राहतील-आ.प्रकाश आवाडे
इचलकरंजी –
ज्यांचा कधी विकासाशी संबंधच आला नाही ते विकासकामांच्या गप्पा मारत आहेत. काम न केल्यामुळे विकासाच्या मुद्यावर बोलता येत नाही, म्हणूनच आमच्यावर व्यक्तीगत टीका करुन सवंग प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण सुज्ञ जनता त्यांना भाळणार नाही तर मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाला साथ देईल. त्यामुळे राहुल आवाडे हेच आमदार होणार, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ रायगड कॉलनी येथे भव्य असा महिला मेळावा पार पडला. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. या मेळाव्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्वच उपस्थित लाडक्या बहिणींनी राहुल आवाडे यांना आमदार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी ताराराणी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नजमा शेख, भाजप महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. वैशाली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मिश्रीलाल जाजू, हरिष लाटणे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, संजय केंगार आदींनी आपल्या मनोगतात आवाडे हे केवळ बोलत नाही तर जे बोलता ते करुन दाखवताा. जनतेने दिलेला विश्वास ते कधीच ढळू देणार नाही. परंतु विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच नसल्याने ते केवळ व्यक्तीगत टीका करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष न देता राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्य कसे होईल याची सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन केले.
याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. सुनिता लाटणे, पुष्पराज लाटणे, श्रेणिक मगदूम, राजू दरीबे, मारुती पाथरवट, शफिक बागवान, संतोष कांदेकर, सर्जेराव हळदकर, राहुल जानवेकर, बिलाल पटवेगार, अमित लिपारे, याकुब मुजावर, मेहबूब मुजावर, बाळासो जाधव, अशोक भागवत, संजय पाटील, बाळू चव्हाण, बाळू सागावकर, सुरेश पाटील, सुनील गोरे, आकाश बेडगे, उमेश गोरे, पांडुरंग बेल्याळ, जगदीश जाधव, सदा कुमठे, महाराणा प्रताप युवक मंडळ, मित्रोदय तरुण मंडळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







