सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा महायुतीच्या प्रयत्नास साथ देत राहुल आवाडेना विजयी करा-मा.आ.सुरेश हाळवणकर.

इचलकरंजी –
महायुती सरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानत विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना बळ दिले आहे. तसेच इचलकरंजी शहरातील गावभागातील समस्त नागरिकांनी सदैव आवाडे यांना पाठबळ दिले आहे. हीच भक्कम साथ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राहुल आवाडे यांना देऊन विक्रमी मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ राम जानकी हॉल येथे कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. याप्रसंगी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. वैशाली आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मतदारसंघाच्या निरिक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी, भाजपाने तरुण तडफदार राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली आहे. शहराच्या सर्वांगिण विकासात आवाडे परिवाराचे योगदान मोलाचे असून तोच वसा आणि वारसा राहुल आवाडे पुढे घेऊन निघाले आहेत. त्यांना सर्वांच्या भक्कम साथीची गरज आहे. महायुतीच्या सरकारकडून राबविलेल्या योजनांची विरोधकांनी धास्ती घेतल्याने ते योजनांबद्दल अपप्रचार करत आहेत. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बाळासाहेब कलागते, अनिल डाळ्या, धोंडीराम जावळे, पापालाल मुजावर, पै. अमृत भोसले, वृषभ जैन, नंदू पाटील, दीपक राशिनकर, सौ. अश्विनी कुबडगे, सौ. वर्षा जोंग, सौ. रमा फाटक, सौ. सीमा कमते, पांडुरंग म्हातुकडे, गजानन लोंढे, सुशांत कलागते, राजेंद्र बचाटे, किशोर पाटील, एम. के. कांबळ, राजु पुजारी आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







