भा ज पा आणि युतीचा पराभव करा!
महा विकास आघाडी आणि डाव्या पुरोगामी, लोकशाहीवादी पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा!-माकप
कोल्हापूर.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटी ची महत्वाची बैठक मुंबई येथे पार पडली.या बैठकीत महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणूका संदर्भात ठोस निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक आणि विद्यार्थी यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर येणे महत्त्वाचे आहे.भाजपा आणि युतीमधील पक्ष जाती धर्माच्या नावावर जनतेमध्ये फुट पाडून, कष्टकरी समाजाला मुलभूत अधिकार पासून वंचित ठेवत आहेत.
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन मिळाले पाहिजे, शेतीमालाला उत्पादन खर्चावर दिडपट भाव मिळावा, योजना कामगारांना सरकारी कर्मचारी दर्जा द्या.शेतमजुर पेन्शन योजना लागू करा, इत्यादी कामे करुन घेण्यासाठी महाविकास आघाडी सत्तेवर आणण्यासाठी जीवाचे रान करा असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे सदस्य कामगार संघटना, किसान सभा, शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना इ.मध्ये काम करीत आहेत त्यानी आपल्या सर्व सदस्यांना घेऊन प्रचारात आघाडी घ्यावी.
कामगार संघटना मध्ये शालेय पोषण आहार कामगार, आशा कर्मचारी, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार,सायझिंग वार्पिंग कामगार, इंजिनिअरिंग कामगार, घर कामगार, औषध विक्रेते प्रतिनिधी ( एम आर) कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी ,इ कामगारांनी आपल्या सी आय टी यु या. केंद्रीय कामगार संघटनेच्या धोरणाप्रमाणे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून प्रचंड मताने निवडून आणायचे आहे.
शेतकरी संघटनेतर्फे, किसान सभा, देवस्थान शेतकरी, ऊस तोडणी कामगार, साखर कामगार, यांनीही प्रचारात आघाडीवर रहावे.
महा विकास आघाडी चे जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा , आघाडीतील मित्रपक्ष म्हणून जाहीर पाठिंबा आहे.इचलकरंजी मध्ये मा मदन कारंडे, हातकणंगले मध्ये मा राजू बाबा आवळे, शिरोळ मध्ये मा गणपतराव पाटील, त्याप्रमाणे राहूल पाटील, ऋतू राज पाटील, सत्यजित पाटील, मा घाडगे, या व इतर सर्व उमेदवारांना पाठिंबा असल्याचे पत्रक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कोल्हापूर जिल्ह्यातर्फे जिल्हा सचिव प्राचार्य काॅ ए बी पाटील यांनी, प्रसिद्ध केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







