मोठे तळे खोकेधारक संघटनेचा मदन कारंडेना पाठिंबा.
इचलकरंजी : येथील मोठे तळे खोकेधारक संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार मदन करंडे यांना जाहीर पाठिंबा दिला. यामध्ये शंभर ते दीडशे खोकेधारकांनी पाठिंबा दिल्या नंतर या ठिकाणी त्याचे कॉर्नर सभेचे रूपांतर झाले. मोठे तळे येथे महानगरपालिकेने आरक्षण टाकले आहे. या पार्श्वभूमीवर कारंडे यांनी येथील खोकेधारकांना धीर देत यातील एकही खोका हलवू देणार नसल्याचे, आश्वासन कारंडे यांनी दिले.
पाठिंबा नंतर कारंडे यांनी तेथील गणेश मंदीर मध्ये जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर कॉर्नर सभेत रूपांतर झाले. महानगरपालिकेच्या वतीने मोठे तळे येथे आरक्षण टाकण्यात आले होते. त्यावेळी आमदार व एकही नगरसेवक या ठिकाणी फिरकला नव्हता. परंतु, महानगरपालिकेमध्ये आमच्या जागेवर टाकलेल्या आरक्षणा संदर्भात जाण्याआधीच मदन कारंडे यांनी तिथे येऊन आम्हाला भावा सारखा धीर दिला. तसेच याठिकाणा वरील एकही खोका हलणार नाही असे,आश्वासन त्यावेळी दिल्यानेच आज कारंडे यांना पाठिंबा दिल्याचे येथील महिला खोकेधारकांनी सांगितले.
अनेक वर्ष याठिकाणी पावसाळ्यात गुढगाभर पाणी साचते तसेच चिखल होत असल्याने ग्राहकांनाही याठिकाणी येतांना अडचणी येतात. त्यामुळे याचा व्यवसायावरही परिणाम होतो. याबाबत अनेक वेळा आमदार व स्थानिक नगरसेवक यांना सांगण्यात आले आहे. मात्र, त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळेच एकसंघ निर्णय घेत महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना पाठिंबा दिल्याचे खोकेधारकांनी सांगितले. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे,प्रदीप नेमिष्टे,रवी नवाळे,रामभाऊ शिंदे,गोपाळ राघवाणी,विशाल शिंदे,अनिल मुरगुडे,अमोल महाजन,अमित शिंदे,राजू मुजावर,अनिल कोरडे,हिदाईत अत्तार,इकबाल अत्तार,नाना पारके यांच्यासह मोठे तळे खोकेधारक संघटना मोठ्या संख्येने उवस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









