ICHMH51NEWS.IN
9921600800

डी.के.टी.ई.च्या प्रा.सौ.गौरी कुलकर्णी यांना पी.एच.डी. प्रदान

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के.टी.ई.च्या प्रा.सौ.गौरी कुलकर्णी यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:
येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल डिप्लोमा विभागात कार्यरत असणारे प्रा. सौ. गौरी कुलकर्णी यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन केमिस्ट्री ही पदवी प्राप्त झाली आहे. प्रा.गौरी कुलकर्णी या गेली १७ वर्षापासून प्राध्यापक म्हणून डीकेटीईमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ‘रिमुव्हल ऑफ सोल्युबल डाइज फ्रॉम टेक्स्टाईल इफल्युएंट बाय ऍडसॉर्प्शन ऑन केमिकली मॉडिफाईड ऍग्रो वेस्ट – अ सस्टेनेबल ऍप्रोच’ या विषयावर पी.एच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. या संशोधनासाठी त्यांना डीकेटीईचे केमिस्ट्री विभागाचे प्रा. डॉ. जे.एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
पी.एच.डी. पूर्ण झालेबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, डे. डायरेक्टर, डॉ यु.जे. पाटील, विभागप्रमुख प्रा. आर. के. वळसंग, डॉ. जे. एम. पाटील उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा