ICHMH51NEWS.IN
9921600800

श्री मोहन चौगुले यांनी  श्री लक्ष्मी नारायण गोशाळेत केला आपला वाढदिवस साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री मोहन चौगुले यांनी  श्री लक्ष्मी नारायण गोशाळेत केला आपला वाढदिवस साजरा

======================
श्री आदिनाथ को-ऑप बॅक लिमिटेड चे माजी संचालक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले नेतृत्व श्री मोहन आण्णासो चौगुले यांनी अनावश्यक खर्चाला फाटा  न देता आज  आपला ५७ वा वाढदिवस शहापूर रोड वरील श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठान, इचलकरंजी संचलित गोशाळेत एक गाडी चारा भेट देत आगळ्या वेगळ्या पध्दतीने सामाजिक बांधिलकी जोपासत प्रतिष्ठान चे संचालक श्री राजू दोशी, श्री विजय गिरमल, श्री अभयकुमार पाटील, श्री शितल पाटील यांच्या उपस्थितीत साजरा केला
प्रारंभी सकाळी  सुविद्य पत्नी सौ.अनिता चौगुले यांनी कुकुंम तिलक लावून औक्षण केले नंतर पूज्य मातोश्री याचे आशिर्वाद घेतले.
नंतर सोनकला काॅलनी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीला अभिषेक केला.श्री आदिनाथ मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्री वरद विनायक मंदिर, श्री रेणुका मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र येथे देवदर्शन घेतले.
डिकेटीई या शैक्षणिक संस्थेत जाऊन सहकार चळवळीतील ज्येष्ठ भिष्माचार्य शिक्षणमहर्षी सहकार तपस्वी माजी खासदार श्री कल्लाप्पाण्णा आवाडे दादा याचे शुभाशीर्वाद घेतले यावेळी शैलेश गोरे,किरण लंगोटे,राहूल जगताप आदि उपस्थित होते.दिवसभरात विविध सामाजिक,राजकीय, सहकार,धार्मिक,सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योग,तसेच अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्री मोहन चौगुले यांच्यावर आशिर्वाद रूपी शुभेच्छांचा वर्षांव केला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा