पाणीटंचाई बरोबरच इचलकरंजीकराना काळ्या पाण्याची शिक्षा.
कोले मळा व्हिडीओ
https://youtu.be/fNdZ5x820g8?si=C-D7eKYQ5I40iJ_5
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील पाणीपुरवठयाचे नियोजन गेल्या १५ दिवसापासून कोलमडले आहे सततच्या गळत्या लागत असल्याने पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर तर येत आहेच त्याबरोबर गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शहराचा पाणीपुरवठा काही भागात ५-६-७-८ दिवसाआड होत असल्याच्या नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत.
यातच कहर म्हणजे भाटले मळा विठ्ठल नगर शहापूर परिसरात गेल्या १ महिन्यापासून सुरुवातीला चावीला गटारीचे पाणी येत असून पाण्याला दुर्गंधीचा वास येत आहे.
तर ९ डिसेंबर रोजी कोले मळा इचलकरंजी येथे चावीला गटारीचे पाणी आले आहे.एकतर विस्कळीत पाणीपुरवठयाने हैराण झालेल्या नागरिकांना काळ्या पाण्याची शिक्षा महापालिका देत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







