संविधान परिवारास विशेष कार्य मानवाधिकार पुरस्कार
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे, आणि जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागर मानवी हक्कांचा अभियान २०२४ कार्यक्रमांतर्गत पुरस्कार प्रदान कार्यक्रमात संविधान परिवारच्या कार्यक्रमाचे कौतुक करत राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जागतिक मानवी हक्क दिनाच्या कार्यक्रमांतर्गत झालेल्या उपक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, भारतीय घटनातज्ञ उल्हास बापट, निवृत्त न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी, जिल्हा वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश डी जे पाटील, प्राचार्य डाॅ सुधाकरराव जाधवर, यशदाचे प्रा बबन जोगदंड आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संविधान परिवार, इचलकरंजीने केलेल्या संविधान जागर आणि अन्य मानवी हक्कांचे रक्षण करणार्या कामाचा राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार संविधान परिवारचे समन्वयक संजय रेंदाळकर, अमोल पाटील, आरिफ पानारी आणि रुचिता पाटील यांनी स्विकारला. यावेळी राजवैभव शोभा रामचंद्र , शीतल यशोधरा, अशोक ह्रदयमानव, विक्रम शिंदे, शामसुंदर सोन्नर आदिंसह मान्यवर तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800