ICHMH51NEWS.IN
9921600800

युवकांकडे कौशल्याबरोबर आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च प्रगतीचे उद्दिष्ट असावे – डॉ. ज्ञानेश्वर मुळे  डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन इचलकरंजी तर्फे आयोजित नोकरी महामेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

युवकांकडे कौशल्याबरोबर आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च प्रगतीचे उद्दिष्ट असावे – डॉ. ज्ञानेश्वर मुळे

 डॉ.ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन इचलकरंजी तर्फे आयोजित नोकरी महामेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद

इचलकरंजी
इचलकरंजी शिक्षण समाज सुधारण्याचा मूलभूत पाया आहे कौशल्यपूर्ण मानव संसाधने तयार करणे काळाची गरज आहे त्यामुळे युवकांना कौशल्याबरोबर आपल्या क्षेत्रातील उत्कृष्टतेचा ध्यास असला पाहिजे असे प्रतिपादन माझी परराष्ट्र सचिव,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.येथील डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन शाखा इचलकरंजी, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी व राहुल खंजिरे युथ फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित नोकरी महामेळावा २०२४ च्या उ‌द्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नेहा कुंभार, उपाध्यक्ष नितिन माने, गवर्नमेंट ऑडिटर संजय मुळे,देशभक्त बाबसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणराव खंजिरे,दि इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजीरे, प्रभारी प्राचार्य डॉ.विरुपाक्ष खानाज,संस्थेचे संचालक भरत पडिया,सचिव शेखर पाटील,प्रवीण खंजीरे,श्रध्दा इन्स्टिट्युट संस्थापक श्री ए.आर.तांबे सर,गुरुकुल शिक्षण समूहाचे अध्यक्ष गणेश नायकवडे सर आदी उपस्थित होते.
   कार्यक्रमात डॉ. मुळे पुढे म्हणाले, सर्व क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. भारतामध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यादृष्टीने रोजगार मेळाव्याचे महत्त्व वाढत आहेत. रोजगार मेळाव्याचा माध्यमातून युवकांना प्रत्येकाला क्षमता व गुणवत्तेला अनुसरून रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होते. तसेच विविध कंपन्या व उ‌द्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवणे सोयीचे होते.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट व्यवस्थापनाने मेळाव्यासाठी उपस्थित तरुण-तरुणींच्या गर्दीत सुद्धा मुलाखतीचे योग्य नियोजन करण्यात आले.
तसेच डॉ. ज्ञानेश्वर फाउंडेशन व नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी यांच्या मधे सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करार अंतर्गत अनेक उपक्रम भविष्यात राबवण्यात येणार आहेत.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन मार्फत नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येते मोफत स्किल डेव्हलपमेंट बॅचेस सुरू करण्यात आले आहेत. ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलप करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशन तर्फे देण्यात आली.
रोजगार मेळावा यशस्वी होण्याकरिता उदय कुंभार,गणेश नायकवडे,गजानन खेतमर,विनायक माळी,मोहन माने यांनी परिश्रम घेतले.
डॉ. ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन इचलकरंजी च्या सहकार्यातून झालेल्या नोकरी महामेळाव्यात सुमारे ३८०० युवकांनी सहभाग नोंदविला. विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ११००० मुलाखती घेण्यात आल्या. तसेच ९०० तरुणांना मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. काही तरुणांची पुन्हा मुलाखती साठी निवड करण्यात आली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा