भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.
इचलकरंजी:
भारताचे माजी पंतप्रधान माननीय श्रद्धेय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या २५ डिसेंबर आज जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालयात फोटो पुजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मा.अटलजी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भाजपा शहर कार्यालयामध्ये पदाधिकारी यांनी भेट दिली. शहराध्यक्ष पै. अमृतमामा भोसले, आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच इचलकरंजीतील नवीन नगरपालिकेजवळ असणाऱ्या भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी चौकामध्ये पदाधिकारी यांच्याकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राजेश रजपुते, बाळकृष्ण तोतला, महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, जेष्ट नेते पांडुरंग म्हातुगडे, प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, महेश पाटील, अनिस म्हालदार, नितीन पडियार, सचिन माळी, अॅड.भरत जोशी, दीपक रावळ, दीपक कोडलकर, अशोक पुरोहित, सौ. नीता भोसले,सौ. अमिता बिरंजे, सौ. कौशल्या गाडे, अभय बाबेल, अरुण कुंभार, संजय गेजगे, नामदेव सातपुते, भानुदास तासगावे, वसंत पोवार, विजय हरूळमठ, रावसाहेब कदम, अश्विनी कुबडगे, सौ. निता भोसले, अरुण कुंभार, नारायन आपटे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, सर्व आघाडी प्रमुख, बुथ प्रमुख व आजी माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800