ICHMH51NEWS.IN
9921600800

शाहीर विजय जगताप यांना शोकसभेत आदरांजली 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शाहीर विजय जगताप यांना शोकसभेत आदरांजली 

इचलकरंजी:
 शाहीर विजय जगताप यांनी शाहिरी कला विकसित करण्याकरता विद्यापीठ आणि संस्थात्मक पातळीवर केलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच पद्धतीने राजकीय, सामाजिक,साहित्य शिक्षण, इत्यादी क्षेत्रात त्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ सातत्यपूर्ण काम केले. इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक व पाणीपुरवठा समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केले. समाजाच्या प्रबोधनासाठी त्यांनी शाहिरी कला व लेखन कौशल्य यांचा वापर केला. तसेच आपली कला देशातील विविध राज्यातील महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सादर केली.ते कालवश होण्याच्या दोन दिवसापूर्वी इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनात
त्यांनी पोवाडा सादर केला होता. तोच त्यांचा अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला. त्यांच्या निधनाने इचलकरंजी व परिसराची फार मोठी संस्कृतीक हानी झालेली आहे. त्यांचे शाहिरी प्रशिक्षणाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल ,असे मत समाजवादी प्रबोधिनी येथे शाहीर विजय जगताप यांना आदरांजली वाहणाऱ्या शोकसभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जयकुमार कोले होते.प्रारंभी चंद्रकांत जगताप यांच्या हस्ते शाहीर विजय जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच या इचलकरंजी चा नाव की देशाच्या कानाकोपऱ्यात येणाऱ्या शाहीर विजय जगताप यांच्या निधनानिमित्त घेत असलेल्या शोकसभेच्या आयोजना मागील भूमिका प्रसाद कुलकर्णी यांनी मांडली.
या शोकसभेत विविध मान्यवरांनी शाहीर विजय जगताप यांच्या कला व विविध क्षेत्रातील कार्याचे पैलू, कलावंताकडे बघण्याचा सामाजिक व राजकीय दृष्टिकोन ,कलाकार आणि कार्यकर्ता यांच्या बाबतीतले सामाजिक उत्तरदायित्व, शाहीर विजय जगताप यांनी शाहिरी कला पुढे नेण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण काम, त्यांचे लेखन, पाणी प्रश्नापासून वीज प्रश्नापर्यंत अनेक प्रश्नांचा असलेला त्याचा व्यासंग, त्यांची एकसष्ठी व अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आदि विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. त्यात प्रामुख्याने मदन कारंडे, अमृतमामा भोसले, दिलीप शेंडे, जावेद मोमीन , मलकारी लवटे,शाहीर बजरंग आंबी , शिवाजी साळुंखे,कॉ. दत्ता माने, राजन मुठाणे, वैशाली नायकवडी, विष्णुपंत नेतले, शाहीर संजय जाधव, मनोहर जोशी यांचा समावेश होता. यावेळी डॉ.हरिश्चंद्र बोरकर व शाहीर अंबादास तावरे यांचे शोकसंदेश वाचून दाखवण्यात आले. अखेरीस जयकुमार कोले यांनी शाहीर विजय जगताप यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला आणि सर्वांनी स्तब्धता पाळून शाहीर विजय जगताप यांना अभिवादन केले. यावेळी शाहीर चंद्रकांत गायकवाड ,शाहीर हिंदुराव लोंढे, इस्माईल समडोळे,किरण कटके, अनिल होगाडे ,अरुण दळवी यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते आणि जगताप कुटुंबीय उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा