महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांचेकडून एस. टी. पी प्लॅंट येथे भेट देऊन पाहणी
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या समवेत आज गुरुवार दि.०२ जानेवारी रोजी महानगर पालिकेच्या टाकवडे वेस येथील एस.टी.पी. प्लॅंटच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
इचलकरंजी शहरासाठी टाकवडे वेस परिसरात नव्याने
१८ एम.एल.डी. क्षमतेच्या एस.टी.पी. प्लॅंटची उभारणी करण्यात येत असून सदर प्लॅंटचे काम पूर्ण झालेले आहे. या प्लॅंटची दि.१३ डिसेंबर रोजी यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे.
सदरचा प्लॅंट पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर सध्या शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या घरगुती सांड पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार आहे
पाहणी दरम्यान सदर प्रकल्पाचे काम गुणवत्ता पुर्वक करून सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे च्या सुचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.
यावेळी शाखा अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे,प्र.विद्युत अभियंता इसरार बेग, प्र.उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण, अंकीता कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







