कामावर येत नसल्याने मारहाण; गुन्हा दाखल
इचलकरंजी
शहापूर पोलीस ठाण्यात कामावर न आल्याचा रागातून मारहाण झाल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारदार सोमनाथ बाळू गंथडे (वय 32) रा भाटले मळा, दत्तनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,आरोपी प्रविण धनाजी पाटील व बाळू पिंटू जगताप यांनी वादातून त्यांच्यावर हल्ला केला.
घटना ४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. फिर्यादी हे प्रवीण पाटील यांच्याकडे कामावर येत नसल्याच्या कारणावरून वाद घालून आरोपींनी मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पो.हे.कॉ बांगर व तपासी अंमलदार कुरणे यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







