स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन
इचलकरंजी:
इचलकरंजी येथील रामकृष्ण सत्संग मंडळाच्यावतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंती निमीत्त व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. यावर्षी १२ जानेवारीपर्यंत चालणार्या या व्याख्यानमालेस ८ जानेवारीला प्रारंभ झाला. दररोज सायंकाळी ६.३० वाजता गायत्री भवनच्या प्रांगणात हे व्याख्यान होणार आहे. पहिल्या दिवशी पुणे येथील सिबाँयसिस कॉमर्स कॉलेजचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिरीष लिमये (पुणे) यांचे कर्मे इशु भजावा या विषयावर व्याख्यान झाले. लेखांबा(अहमदाबाद) येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष पू. स्वा. प्रभुसेवानंद यांचे पत्रांतून व्यक्त झालेले विवेकानंद या विषयावर ९ जानेवारीला आणि १० जानेवारीला स्वमीजी आणि त्यांचे गुरुबंधु या विषयावर व्याख्यान होणार आहे.११ जानेवारीला श्री सारदा मठ, पुणे चे पू. प्र. निरंजनप्राणा यांचे आद्याशक्ती माँ सारदादेवी आणि १२ जानेवारीला अभय भंडारी (विटा) यांचे राष्ट्र हेच दैवत या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचा नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800