ICHMH51NEWS.IN
9921600800

आठवण..पत्रकार नाना पालकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आठवण..पत्रकार नाना पालकर

कोल्हापूर

१९९० ते ९५.विद्यार्थी बातमीदार  ते शहर बातमीदार म्हणून कोल्हापूर शहरात काम करायची संधी मिळाली . त्यावेळच्या  शहराच्या पत्रकारिता क्षेत्रांमध्ये  कै. सोपान पाटील  ,  कै. दिलीप कुलकर्णी , नाना पालकर , विलासराव झुंजार  , नंदकुमार ओतारी   , कै. प्रकाशराव  , सुनंदा मोरे मॅडम  ,   कै.एन डी पाटील  ,  उदय कुलकर्णी  , चंद्रशेखर माथाडे  ,  भारत चव्हाण  , किशोर संकपाळ , श्री आंबेकर (PTI ) , श्री काईंगडे (UNI )  सुधाकर काशीद  , विजय चोरमारे   अशी काही मोजकी   आउटडोर , प्रत्यक्ष  फिल्ड मध्ये काम करणारी  वरिष्ठ  पत्रकार मंडळी  असायची . त्या सर्वांमध्ये  नाना पालकर  नावाप्रमाणे ( नाना म्हणजे आजोबा )  आम्हा सर्व नवख्या , शिकाऊ , उत्साही    पत्रकारितेत नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्वांची काळजी घ्यायचे . मी वयाने मोठा आहे , वरिष्ठ आहे .  असा त्यानी कधीही गर्व केल्याचे आम्हाला दिसले नाही . पत्रकारांचे मजबूत संघटन असावे  ,अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती . 6 डिसेंबर पत्रकार दिनी त्यांनी आम्हा  पत्रकारांना दर्पणकार  दिवंगत बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी  नेले होते . गेले काही दिवस ते आजारी होते . अमेरिकेत मुलाकडे ते कॅलिफोर्निया ला जाऊन आल्यानंतर त्यांनी एक मस्त पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती .  त्या काळात सर्व राजकारणी  कोकणचा कॅलिफोर्निया करणार , असे नेहमी पत्रकार परिषद व सभेमध्ये सांगायची त्या संदर्भाने ते प्रत्यक्ष अमेरिकेत मुलाकडे   कॅलिफोर्नियाला  जाऊन आले होते .  त्यांचे स्वप्न   पूर्ण झाले पण   कोकणचा कॅलिफोर्निया करणार हे ,  राजकारणी लोकांनी राज्यातील जनतेला  दाखवलेले स्वप्न अजून  स्वप्नच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती .  इस्लाम धर्मातील पवित्र  हज यात्रा त्यांनी केली होती .     “पत्रकारितेतील नाना कळा  ”  असे एखादे आत्मचरित्र लिहिण्याची मी त्यांना विनंती केली होती .  , परंतु आत्मचरित्रात   सर्व खरे लिहावे लागल . त्यामुळे काहीजण दुखण्याची शक्यता आहे ,  असे सांगून त्यांनी हा विषय टाळला होता . परंतु नवीन पिढीसाठी  , मार्गदर्शन व   दैदिप्यमान कोल्हापूर शहराचा  इतिहास , घडामोडी ,  संदर्भ   जाणून घेण्यासाठी  त्यांनी आत्मचरित्र लिहिणे आवश्यक होते,असो..परम श्रेष्ठ अल्लाताला  त्यांना स्वर्गप्राप्ती करो..अशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

ए. आय. बागवान   / कोल्हापूर  .
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा