बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाई तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इचलकरंजी:
बांधकाम क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर व क्रेडाई इचलकरंजी या दोन्ही संस्थांनी सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत या संस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान, क्रेडाई इचलकरंजी प्रेसिडेंट मयूर शहा, माजी अध्यक्ष नितीन धूत, सय्यद गफारी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत जय भवानी विद्या मंदिर क्रमांक 11 मधील 200 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. फैयाज गैबान यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात मयुर शहा यांनी, पुढील काळातही दोन्ही संस्थांच्या वतीने सतत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातील, अशी ग्वाही दिली.
यावेळी मोहन सातपुते, राजेंद्र शिंत्रे, सम्मेद मगदूम, प्रितेश शहा, भगवान कांबुरे, चंद्रकांत भागाजे, शिवाजी पवार, विकास चंगेडीया, इकबाल अरब, मितेश बलवान, महेश महाजन, प्रथमेश मेटे आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी-विद्यार्थीनी, पालक उपस्थित होते.
फोटो ओळ – विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना नितीन धुत, फैय्याज गैबान, मयुर शहा, सय्यद गफारी व मान्यवर

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800