ICHMH51NEWS.IN
9921600800

जर्मन गँगचा फरारी साहिल हबीब फनिबंद याला ८ महिन्यांनी अटक,तपासासाठी भागात फिरवले.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जर्मन गँगचा फरारी साहिल हबीब फनिबंद याला ८ महिन्यांनी अटक,तपासासाठी भागात फिरवले.

इचलकरंजी:
 ८ महिन्यांपूर्वी घडलेल्या गुन्ह्यात फरार आरोपी साहिल हबीब फनिबंद, वय २७,रा.रोशन मजीद जवळ, विभुते गल्ली, जवाहरनगर, इचलकरंजी, याला अटक करण्यात आला आहे. तो जर्मन गँगचा सदस्य असून ८ महिन्यांपासून फरारी होता.
गाडी भाड्याने घेतलेल्या प्रकरणातून झालेल्या भाग्यरेखा टॉकीज जवळ झालेल्या मारामारीत स्तवन आवळे यांने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद आहे.
 झालेल्या मारामारीत साहिल सहभागी होता तसेच फरारी होता.त्याला कोर्टात हजर केल्यानंतर १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने पुढील चौकशीसाठी व तपासासाठी त्याला कामगार चाळ परिसरात फिरवले गेले आहे.
ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पो नि सचिन पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा