ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्रपणे राबविणेत येणार-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्रपणे राबविणेत येणार-आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील

इचलकरंजी:
   इचलकरंजी शहरात मुख्य रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आलेने आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्रपणे राबविणेच्या सुचना अतिक्रमण विभागास दिलेल्या होत्या.
   या अनुषंगाने उपायुक्त नंदु परळकर आणि सहा आयुक्त विजय राजापुरे यांच्या मार्गदर्शना खाली महानगरपालिकेच्या वतीने आज सोमवार दि.२१ एप्रिल पासून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम हाती घेण्यात आली.
   आजच्या मोहीमेमध्ये शहरातील कोल्हापूर नाका ते शिवतीर्थ या मुख्य रस्त्यावर अडथळा निर्माण होत असलेले लहान मोठे २० स्टॅंड बोर्ड तसेच बंद अवस्थेत असलेले ४ हातगाडे जप्त करण्यात आलेले आहेत.
    आजच्या मोहीमेमध्ये अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे, गणेश पुजारी, विकास लाखे,मारुती जावळे प्रकाश हेगडे, महेश आवळे आदि सहभागी झाले होते.
    या पुढेही महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांसह अन्यत्र कुठेही व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेस सदर अतिक्रमण केलेले हातगाडे , इतर साहित्य जप्ती करणेसह संबंधितावर दंडात्मक कारवाई करणेतचा इशारा  आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांचेकडून देणेत येत आहे.
अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवताना महानगरपालिका कर्मचारी.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा