हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवणारे दोन आरोपी ताब्यात
शहापुर (ता. हातकणंगले) :
संगमनगर, तारदाळ येथे विनापरवाना प्राणघातक धारदार शस्त्रे घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना शहापुर पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले.या कारवाईत तलवार, कोयता, गुप्ती आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहाटेच्या सुमारास संगमनगर, तारदाळ येथे खिलारे यांच्या घरासमोर घडली. आरोपी गंगा प्रविण पाटील (वय १९ रा. बेघर वसाहत, यड्राव ता. शिरोळ) व विनायक अनिल मिठारे (वय २३, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) असे ताब्यात घेतलेल्या इसमांचे नाव आहे.
पोलिसांना रात्रगस्त दरम्यान ही माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपींना शस्त्रांसह पकडले. त्यांच्याकडून एक धारदार तलवार, एक कोयता, एक गुप्ती आणि हिरो होंडा मोटरसायकल (क्र. MH-09 DT-3998) जप्त करण्यात आली.
सदर प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.ना. गजानन कोष्टी करीत आहेत.
जप्त केलेली हत्यारे व अटक केलेल्या आरोपींसह शहापूर पोलीस

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800