पहेलगाम हल्ल्याचा इंडिया आघाडीचा तीव्र निषेध; इचलकरंजीत श्रद्धांजली व निदर्शने.
इचलकरंजी (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा इचलकरंजीत तीव्र निषेध करण्यात आला. इंडिया आघाडीच्या वतीने शहरात निदर्शने करून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या निदर्शनात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये शशांक बावचकर, मदन कारंडे, सदा मलाबादे, सयाजी चव्हाण, उदयसिंह पाटील, जयकुमार कोले, प्रसाद कुलकर्णी, बाबासो कोतवाल, युवराज शिंगाडे, शशिकांत देसाई, बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे, भाऊसाब कसबे, प्रकाश मोरबाळे, अरुण गिते, किशोर जोशी, रवि पाटील यांचा समावेश होता. याशिवाय असंख्य कार्यकर्तेही या निदर्शनात सहभागी झाले होते.
निदर्शनादरम्यान, केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. उपस्थितांनी हल्ल्यात बळी गेलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरली असून, इचलकरंजीतील नागरिकांनीही या घटनेविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.
निदर्शने करताना इंडिया आघाडीचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








