ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका अधिकारी, लिपिक, टंकलेखक यांचेसाठी ई ऑफिस’ (eOffic)  प्रणाली अंतर्गत प्रशिक्षण संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका अधिकारी, लिपिक, टंकलेखक यांचेसाठी ई ऑफिस’ (eOffic)  प्रणाली अंतर्गत प्रशिक्षण संपन्न

   इचलकरंजी
महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय , निमशासकीय तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांचे कामकाज सद्यःस्थितीत ‘ई- ऑफिस’ या संगणकीय प्रणाली अंतर्गत  करणेचे निर्देश शासन स्तरावरून देणेत आलेले आहेत.
                  या निर्देशानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज सुद्धा ई ऑफिस या संगणकीय प्रणाली अंतर्गत सुरु करणेचे आदेश दिले असून महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज ई ऑफिस प्रणाली अंतर्गत सुरु करणेत आलेले आहे.
   या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिक वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक तत्सम पदावर काम करणारे कर्मचारी यांना प्रशिक्षण देणेबाबत विभागीय संचालक, All India Institute of Local Self Govt. कोल्हापूर, यांचेकडील प्रस्ताव प्राप्त झालेला होता.
 या प्रस्तावानुसार कार्यालयीन कामकाज सोयीचे होण्यासाठी कार्यालयीन टिपणी व कार्यालयीन कामकाज (ई-ऑफिस) या विषयावर प्रशिक्षण मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहात प्रशिक्षण  आयोजित करणेत आले होते.
  या प्रशिक्षणाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे तसेच उपायुक्त नंदु परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत आला.
      इचलकरंजी महानगरपालिके कडून ई ऑफिस प्रणालीचा १००% वापर करत असले बाबतची नोंद राज्य स्तरावर घेणेत आलेली आहे ही बाब या प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी सांगितले.
   विभागीय संचालक स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूर या
कार्यालया मार्फत जी.टी.महाजन सहाकोषागार अधिकारी जळगाव, विजय शिंदे , प्रशासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था कोल्हापूर यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून पी.पी.टी. द्वारे सादरीकरण केले.
त्याचबरोबर या प्रणालीचे कामकाज करत असताना येत असलेल्या अडचणींचे निराकरण केले.
     या प्रशिक्षणासाठी सहा आयुक्त रोशनी गोडे, सहा आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, सहा.संचालक नगररचना प्रशांत भोसले यांचे सह सर्व विभाग प्रमुख, वरीष्ठ लिपिक,
स्वच्छता निरीक्षक, लिपिक टंकलेखक उपस्थित होते.
       फोटो- ई ऑफिस प्रणालीबाबत मार्गदर्शन सुरू असताना अधिकारी व कर्मचारी वर्ग
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा