इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिनानिमित्त शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न
इचलकरंजी
महाराष्ट्र शासनाने २८ एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. शासन निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाने सेवा हक्क दिन साजरा करणेबाबत कळविले आहे.
या अनुषंगाने दि.२८ एप्रिल २०२५
रोजी इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपुर्तीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून साजरा करणेत येणार असून या अंतर्गत उपायुक्त नंदु परळकर आणि सहा.आयुक्त रोशनी गोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. २८ एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहामध्ये सेवा हक्काची बांधिलकी मानणारी शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, कार्यालयीन अधिक्षक प्रियांका बनसोडे, महिला बाल कल्याण अधिकारी सीमा धुमाळ, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, अभियंता बाजी कांबळे, शितल पाटील, गौस जमादार, रामचंद्र कांबळे,गणेश शिंदे यांचेसह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शपथग्रहण करताना मनपा कर्मचारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







