ICHMH51NEWS.IN
9921600800

श्रम साफल्य योजनेचा अंतिम प्रस्ताव ५ मे रोजी शासनाकडे सादर होणार – आयुक्त पल्लवी पाटील 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रम साफल्य योजनेचा अंतिम प्रस्ताव ५ मे रोजी शासनाकडे सादर होणार – आयुक्त पल्लवी पाटील 

इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत २५ वर्षांपेक्षा अधिक सेवा बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर मोफत सदनिका देण्याच्या प्रस्तावास अंतिम स्वरूप देण्यात आले असून, दिनांक ५ मे २०२५ रोजी सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांनी दिली.

यासंदर्भातील पहिली बैठक दिनांक ११ एप्रिल रोजी पार पडली होती. त्यानंतर दिनांक २९ एप्रिल रोजी महानगरपालिका सभागृहात झालेल्या दुसऱ्या बैठकीत आमदार डॉ. राहुल आवाडे व आयुक्त पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेच्या पुढील टप्प्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीदरम्यान पिनाका कन्सल्टंट्स या सल्लागार संस्थेमार्फत प्रस्तावित इमारतीचे वॉक थ्रू प्रणालीद्वारे सादरीकरण करण्यात आले. इमारतीच्या आराखड्यात काही आवश्यक बदल करण्याची सूचना आमदार डॉ. आवाडे व आयुक्त पाटील यांनी केली. सर्व संबंधितांच्या सहमतीने हे बदल करून अंतिम प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी योजनेच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याची मागणी केली, जी आयुक्तांनी मान्य केली.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त सौ. सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, सहायक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, अभियंता बाजी कांबळे, विद्युत अभियंता इसरार बेग, तसेच नगररचनाकार, माजी लोकप्रतिनिधी, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व पिनाका कन्सल्टंट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान आ.राहुल आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील व इतर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा