भाजपा कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
इचलकरंजी
देशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे परंपरेने साजरी करण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा जेष्ठ कार्यकर्त्या श्रीमती कल्पना गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयघोषात अभिवादन करण्यात आले. शहराध्यक्ष पै.अमृतमामा भोसले उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अतुलनीय कार्य, निस्सीम राष्ट्रप्रेम, समानता, राजकता, धर्मप्रेम व त्यांची हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठीची अनाकलनीय निष्ठाया गोष्टींचा उल्लेख करत त्यांचे युद्ध धोरण, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नसून त्यांच्या विचारांना अंगीकरण करावे असे सुरेश हळवणकर यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक तरुणांनी प्रयत्न करावे असे म्हणाले.
तसेच शिवतीर्थ येथे हि श्री छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुड पुतळ्यास पुष्पहार पुष्पवृष्टी करून मानाचा मुजरा करत भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस राजेश रजपुते, बाळकृष्ण तोतला, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, प्रकाश दत्तवाडे, पांडुरंग म्हातुगडे, उमाकांत दाभोळे, महेश पाटील, दीपक पाटील, सौ, सुवर्ण लाड, सौ.सपना भिसे, सौ.सीमा कमते, सौ, मंगल सुर्वे, सौ.अर्चना कुडचे, संजय केंगार, भरत भोंगार्डे, नरसिंग पारीख, राजेंद्र आरेकर, शेखर शहा, आशिष खंडेलवाल, अरुण कुंभार, सतीश भस्मे, प्रमोद बचाटे, श्रीरंग खवरे, विजय कांबळे, प्रशांत कांबळे, बाळासाहेब माने, नामदेव सातपुते, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट, संजय गेजगे, आकाशा मुल्ला, चंद्रकांत चौगुले, भानुदास तासगावे, राजू भाकरे, राजेंद्र पाटील, चंद्रकांत इंगवले, विजय पोवळे, हर्षवर्धन गोरे, मनोज तराळ, संजय नागुरे, किशोर श्रावणे, विजय हावळे,आनंदा दोपारे, संजय चोपडे, भीमराव नीडगुंडे, सुभाष जाधव, आकाशा मुल्ला, तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







