आ.रा.पाटील कन्या महाविद्यालयाचा ८९.७९ टक्के निकाल
इचलकरंजी येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के लागला. कला विभागातून कुमारी परविन गौसखादिर सनदी हिने ८४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला तर वाणिज्य विभागातून कुमारी खुशी राजेश केसरवानी हिने ८५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.
कला विभागाचा निकाल ८५.१८ टक्के लागला तर वाणिज्य विभागाचा निकाल ९७.६७ टक्के लागला.
यशस्वी विद्यार्थिनींचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे यांनी अभिनंदन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







