ICHMH51NEWS.IN
9921600800

परिस्थितीशी झुंज देत पूर्वाची घवघवीत यशकथा – दहावीत ९३.६% गुण

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

परिस्थितीशी झुंज देत पूर्वाची घवघवीत यशकथा – दहावीत ९३.६% गुण

इचलकरंजी – जिद्द, मेहनत आणि आईच्या आधारावर शिक्षणात यश मिळवणारी इचलकरंजीतील मनेरे हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा वागावकर हिने दहावीच्या परीक्षेत ९३.६ टक्के गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परिस्थितीचे बंधन झुगारून शिक्षणासाठी रोज पहाटे ५ ते ६ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या पूर्वाने चौथा क्रमांक पटकावला असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

फक्त आईच्या छत्रछायेत वाढलेल्या पूर्वाच्या या यशामागे आईची शिकवण्याची जिद्द आणि शिक्षकांचे प्रोत्साहन हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. घरात आईला शिवणकामात आणि इतर कामात मदत करत करत पूर्वा दररोज १६ ते १७ तास अभ्यास करत होती. परिस्थितीची जाणीव असल्यामुळेच तिच्या मनात यश मिळवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती.

पूर्वा लहानपणापासूनच अत्यंत हुशार असून विविध कला आणि स्पर्धांमध्ये तिने आपले कौशल्य सिद्ध केले आहे. परीक्षेच्या काळात काही कंटकांनी तिचा अपमान केला होता, तरीही तो गिळून तिने उत्तम कामगिरी केली. तिच्या या जिद्दी स्वभावामुळे तिला भविष्यात नक्कीच मोठे यश गाठता येईल, असा विश्वास तिच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

पूर्वाच्या या यशाची इचलकरंजीचे माजी आमदार श्री. प्रकाश आवाडे (अण्णा) यांच्यासह अनेक मान्यवरांनी दखल घेत प्रशंसा केली आहे. तिचे स्वप्न आहे डॉक्टर होण्याचे, आणि त्यासाठी लागणारा खर्च ती शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भागवण्याचा प्रयत्न करत आहे.तिच्या या यशस्वी वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पूर्वा वागावकर हे नाव भविष्यात नक्कीच उजळून निघेल, यात शंका नाही.

पूर्वाचा सत्कार करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा