महिलांना मोबाईलवर त्रास देणारा घरफोडीचा आरोपी जेरबंद – १.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
इचलकरंजी:
कबनूर येथे घरफोडी करून मोबाईल चोरी करणारा व त्या मोबाईलवरून महिलांना रात्री अपरात्री त्रास देणारा आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केला असून त्याच्याकडून १,३५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. ४ मे ते ५ मे २०२५ दरम्यान मिनाक्षी शैलेश कोपद (रा. फरांडे मळा, कबनूर) यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरी केला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. तपासादरम्यान महिलांना एक इसम मोबाईलवरून त्रास देत असल्याचे निदर्शनास आले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचे नाव स्वप्निल कुंभार (रा. शाहूनगर, चंदूर) असे स्पष्ट झाले. तो तीन बत्ती चौक, इचलकरंजी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून मणी मंगळसूत्र, रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल असा १.३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
ही कारवाई जिल्हापोलीस प्रमुख महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मुद्देमालासह आरोपी स्वप्निल कुंभार
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








