शहापूर पोलिसांची मोठी कारवाई: मोटरसायकल चोरी प्रकरणात सराईत आरोपीकडून ७ दुचाकी जप्त इचलकरंजी
शहापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. प्रशांत केशव माने (वय ३५, रा. धनगर गल्ली, पेठ वडगाव, ता. हातकणंगले) यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात, पोलिसांनी आलिम इम्तियाज गादड (वय २०, रा. जांभळी, ता. शिरोळ) या सराईत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या ७ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये आहे.
या कारवाईत बजाज कंपनीची केटीएम, टीव्हीएस एक्सेस १२५, होंडा अॅक्टीव्हा आणि स्प्लेंडर अशा विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे. या दुचाकी जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, रायबाग आणि बेळगाव (कर्नाटक) येथून चोरी करण्यात आल्या होत्या.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार स्वाती झुगर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







