ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत दुर्गा वाहिनी प्रशिक्षण वर्ग २०२५ चे आयोजन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत दुर्गा वाहिनी प्रशिक्षण वर्ग २०२५ चे आयोजन.

इचलकरंजी

इचलकरंजीत दुर्गा वाहिनी प्रशिक्षण वर्ग २०२५ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ज्या समाजात स्त्रीचा आदर केला जातो, तेथे देवतांचे वास्तव्य असते ही विचारधारा हिंदुस्थानच्या घरा घरामध्ये पोचवण्याचे कार्य विहिपच्या दुर्गा वाहिनी आयमातर्फे केला जाते.. लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या स्रीशक्तीच्या प्रतीके आहेत. संकटांच्या काळात दुर्गेच्या रूपात स्त्रीशक्तीने समाजाचे रक्षण केले आहे. आजही देश, धर्म आणि संस्कृतीवर संकटे आहेत,याचा सामना करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची दुर्गा वाहिनी १९९१ पासून कार्यरत आहे.हिंदू युवतीनी समाजातील धर्मांध शक्ती विरोधात लढण्यासाठी परिपूर्ण पणे सज्ज असावे यासाठीच दरवर्षी हिंदू युवतींचे प्रशिक्षण दुर्गा वहिनी मार्फत घेण्यात येते..त्याचाच भाग म्हणून या वर्षीचा पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा दुर्गा वहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग हा आपल्या इचलकरंजी मध्ये घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे.सदर निवासी वर्ग एकूण ८ दिवसाचा असून पश्चिम महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमधून युवती प्रशिक्षणासाठी सहभागी होणार आहेत..सदर वर्गामध्ये युवतींना आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांचा :- १) मानसिक विकास :- स्त्री आत्मसन्मान व व्यक्तिमत्व घडवणारी चर्चासत्रे.. २)बौद्धिक विकास :- सद्यस्थितीवरील सामाजिक विषयांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन.. ३)व्यक्तिमत्व विकास :- भाषण कौशल्य, चर्चा सत्रे, पारंपरिक खेळ, देशभक्तीपर गीत, प्रश्नमंजुषा सोबतच ४)स्वसंरक्षणाचे प्रशिक्षणः-कराटे, दंड, छुरीक, खड्ग, योग, प्राणायाम, खेळ या विविध माध्यमातून प्रशिक्षित देव देश धर्माच्या कार्यासाठी सज्ज केले जाते.. सदर वर्ग स्थान व कालावधी खालीलप्रमाणे :- वर्ग कालावधी :- दि. २४ मे २०२५ ते ३१ मे २०२५वर्ग स्थान :- सौ. इंदुमती कलाप्पाण्णा आवाडे शैक्षणिक संकुल (DKTE), सहकार नगर, इचलकरंजी

हजारो युवती या वर्गांतून प्रशिक्षित होऊन देशसेवेचे कार्य करत आहेत. या निमित्ताने आपणही सर्वानी सेवा, सुरक्षा, संस्कार आणि संघटन या चार सूत्रांतून आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाका आणि दुर्गा वाहिनीच्या या दैवी प्रवाहात सहभागी व्हा.असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेस  सौ. गायत्री देशपांडे कुंभार, सौ रेवती हणमसागर, सौ अर्चना रानडे, श्री.शिवजी व्यास, श्री सुजित कांबळे, श्री.प्रविण सामंत, श्री.रावसाहेब चौगुले,श्री राहुल बोरा..उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा