यंत्रमागधारकांनी पेमेंटधारेनुसार काम करावे-पॉवरलुम असोसिएशन.
इचलकरंजी
इचलकरंजीतील सर्व यंत्रमागधारकांना कळविणेत येते की, दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनने मागे सर्व प्रकारच्या कापडाची पेमेंटधारा ठरवून दिलेली आहे. त्या पेमेंटधारेप्रमाणेच सर्व यंत्रमागधारकांनी कापड विक्री करावी. त्याचबरोबर नोंदणीकृत अडते व दलालांमार्फत व्यवहार करावेत. पुन्हा एकदा दिवाळखोरीचे प्रकार सुरू झालेले आहेत. त्यामुळे यंत्रमागधारकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यंत्रमागधारकांनी परस्पर काम करून नये व ठरवून दिलेल्या पेमेंटधारेपेक्षा जास्त दिवसांची पेमेंटधारा मान्य करू नये. जितके पेमेंटचे दिवस जास्तीचे तेवढी रिस्क व फसवणूक होणेची शक्यता जास्त आहे. कांही परगावातील केंद्रातील व्यापारी जादा दराने खरेदीचे आमिष दाखवून पहिले कांही सौदे अचुक पेमेंट करून विश्वास संपादन करीत आहेत. व नंतर मोठ्या प्रमाणात ग्रे कापड खरेदी करून पुढे ग्रे कापड खरेदी दरापेक्षा कमी दराने विकत आहेत असे निदर्शनास आले आहे.
तरी सर्व यंत्रमागधारकांनी सावधगिरीने व विश्वासू आडते, ट्रेडर आणि दलाल यांच्याबरोबर व्यवहार करावे असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलेले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







