सुळकुड योजना कार्यान्वित करण्याची खा.धैर्यशील मानेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इचलकरंजी:
इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणेबाबत कार्यवाही करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात आले होते
यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन मागण्याच्या निवेदन सादर केले यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी हे शहर ३.५० लाख वस्तीचे आहे. शहरात सध्या ४५ एमएलडी इतकाच पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात २ ते ३ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सध्या शहराला ८९ एम.एल डी इतक्या पाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दुधगंगा नदीवरुन पिण्याच्या पाण्यासाठी सुळकूड, ता. कागल येथील उद्भव निश्चित करुन शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ योजने अंतर्गत १६० कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी दिली आहे. तथापी गैरसमजामुळे काही गावांतून या योजनेला विरोध दर्शविला जात आहे. सदर पाणी योजनेच्या अंमलबजावणी दि. ०१ मार्च २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नाम. एकनाथजी शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीमध्ये या प्रश्नासंबंधी कृती समिती सदस्य आणि अधिकारी यांची नियुक्ती करुन अहवाल सादर करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानंतर २१ मार्च२०२५ आपल्या अध्यक्षतेखाली सविस्तर बैठक झालेली आहे.तरी इचलकरंजी शहरासाठी पाणी पुरवठा योजना त्वरीत कार्यन्वीत करुन शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणावा अशी मागणी करण्यात आली यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आम राहुल आवाडे उपस्थित होते.
सुळकुड पाणी योजना कार्यान्वित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करताना खा. धैर्यशील माने, उपस्थित आ.राहुल आवाडे,पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







