ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजी महानगरपालिका: संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून छावण्यांची पाहणी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी महानगरपालिका: संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडून छावण्यांची पाहणी

इचलकरंजी:

 

शहरातील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी आज विविध पूरग्रस्त छावण्यांना भेट देत पाहणी केली. त्यांच्या सोबत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर व अशोक कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पंचगंगा नदीच्या घाट परिसरासह नारायणराव घोरपडे नाट्यगृह, वेदभवन, राजीव गांधी भवन, जिम्नॅशियम भवन, राजर्षी शाहू हायस्कूल, पद्मावती शाळा, हुतात्मा बाबू गेणु शाळा, तांबे माळ शाळा, जय भवानी शाळा व शांतिनाथ विद्या मंदिर या ठिकाणी नियोजित छावण्यांची पाहणी करण्यात आली.

पाहणी दरम्यान आयुक्त पाटील यांनी छावण्यांतील अडचणींचा आढावा घेत, विद्युत आणि पाणी पुरवठा, शौचालयांची दुरुस्ती यासारख्या मूलभूत सुविधा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या.

या पाहणीसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, विद्युत अभियंता इसरार बेग, अभियंता बाजी कांबळे, वाहन अधीक्षक प्रशांत आरगे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संजय कांबळे उपस्थित होते.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा